शिष्यवृत्ती

Sunday, January 2, 2022

 बलशाली भारतासाठी ज्ञानमंदिरे असणाऱ्या शाळांना हात द्या -गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर    

        शिराळा तालुक्यात शिक्षण विभागामार्फत  समृद्धशाळेसाठी ध्यासपूर्ण पालकसंवाद उपक्रम.
    
    I ललकार वृत्त l
शिराळा
      बलशाली भारतासाठी ज्ञानमंदिरे असणाऱ्या शाळांना हात द्या  अशी साद गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांनी पालकांना घातली .
   ते जिल्हा परिषद शाळा पाडळी ता.शिराळा येथे माझी शाळा आदर्श शाळा या  सांगली जिल्हा परिषदेच्या पायलट प्रकल्पा अंतर्गत पालकसभेत बोलत होते.यावेळी बोलताना त्यांनी मॉडेल स्कुल निर्मिती मधील लोकसहभाग, समृध्द शाळेचा प्रवास याबाबत प्रेरणात्मक संबोधन केले.यामुळे  दातृत्वाची परंपरा असलेल्या पाडळी ग्रामस्थांनी शाळेला सहकार्य करण्यासाठी एकीची वज्रमूठ केली.
     कार्यक्रम प्रसंगी विकास सेवासोसायटी पाडळी,रमेश पाटील पाडळेवाडी,तसेच विघ्नेश व वेदांत पाटील या चिमुकल्या भावंडानी शाळेस बाला उपक्रमासाठी आर्थिक मदत दिली.
     यापालक संवाद उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणविस्तार अधिकारी विष्णू दळवीसाहेब, केंद्रप्रमुख सुहास रोकडे साहेब,वरिष्ठ मुख्याध्यापक विठ्ठल पाटील सर्व शिक्षकस्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
     सदर पालकसभेस सरपंच,उपसरपंच,सर्व ग्राम पंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सेवासोयटी चे चेअरमन, युवा मंडळे पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.शिक्षण महादेव देसाई, बाळकृष्ण गवळी,आशाकिरण पाटील,तृप्ती मुळीक, मंगल पाटील,अंगणवाडी ताई संगीता कांबळे,वंदना पाटील उपस्थित होते.

 बलशाली भारतासाठी ज्ञानमंदिरे असणाऱ्या शाळांना हात द्या -गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर             शिराळा तालुक्यात शिक्षण विभागामार्फ...